मांगली ( सिहोरा) येथे विज पडून महिलेचा मृत्यु
विजेच्या कडाडल्याने मांगली हादरली - एकाची जागेवरच मृत्यू तर तिन घायल
सिहोरा :- पावसाच्या सरी ची वाट पाहत बसलेल्या शेतकऱ्यांना आता जीव गमावन्याची पाळी आलेली आहे. सिहोरा परिसरामध्ये आज आलेल्या दुपारच्या पावसाने शेती तर कोरडीच राहिली पण विज कडाडल्याने शेतामध्ये परा लावयला गेलेल्या एका शेत मजूराची जागेवरच विज पडल्याने मृत्यु झाली. मृतक महिला शेत मजूराचे नाव अंतकला हिरामण (नेवारे) पटले वय अंदाजे 60 वर्ष मरण पावली असून आणखी तीन महिला शेत मजुरांची परिस्तिथि गंभीर आहे. या तिन्ही महिला शेत मजूरांना उपचारा करिता सिहोरा येथे हलविण्यात आले आहे. 4 च्या सुमारास घडलेल्या या घटने ची माहिती सिहोरा पोलिस स्टेशन ला देण्यात आली असून पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केलेली आहे.
एका महिलेची मृत्यू झाली असून तीन महिला जखमी आहेत. त्यात विजया मुन्नालाल शरणागत, लीलाबाई नीलकंठ करंडे, शुशिला साहेबराव शरणागत यांचा समावेश आहे. यात ही एक महिला गंभीर जख्मी असल्याची माहिती मिळालेली आहे.
संकलन चंद्रशेखर भोयर
Post a Comment