लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती ठरली प्रेरणादायी
कांद्री येथे साहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्य उपस्थित मान्यवर
भंडारा:- दिनांक 05 ऑगस्ट 2024 रोज सोमवार ला मौजा कांद्री येथे साहित्यकार लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. आमदार राजुभाऊ माणिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमिचे पूजन व मालरपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करून पाहुण्यांना सम्मानित करण्यात आले. यावेळी आयोजकानी आमदार राजू भाऊ कारेमोरे यांचे शाल, पुष्प गुच्छ देऊन सत्कार केले.
यावेळी आपल्या मार्ग दर्शनातून संबोधित करतानी राजुभाऊ कारेमोरे म्हणाले कि महपुरुषाचे विचार त्यांचा इतिहास हा प्रत्येक समाजा पर्यंत पोहचविंणे गरजेचे आहे. तेव्हाच समाजात जागृतता येईल. कारण आपल्या देशात जितके पण महापुरुष झाले. विविध जाती धर्मा मंध्ये त्यांचा जन्म झाला. परंतु त्यांनी कधीच भेदभाव केलेला नाही आपण सुद्धा त्यांच्या विचारावर चालणे गरजेचे आहे.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेशजी बालपांडे
प्रमुख अतिथी श्री. रितेशजी वासनिक सभापती पं. स. मोहाड़ी
श्री.प्रमेशजी नलगोपूलवार माजी उपसरपंच कांद्री, श्री. शामरावजी गजभिये, श्री. सुनिलजी मेश्राम ,
श्री. शिशुपालजी मेश्राम, श्री. निलेशजी गोण्डाने
श्री. मोरेश्वर निनावे, श्री.कवळू खंडाळे, महादेवजी गायकवाड़, उमेशजी भसगौरे, देवदास खंडाळे, नरेश खंडाळे,उमेश खड़से,गणेश वानखेड़े,बालू शेळके,निशांत डोंगरे, प्रशांत डोंगरे, रितेश डोंगरे, अनमोल गजभिये, कमलेश गजभिये, गोपाल डोंगरे, साहिल गायकवाड़,जगदीश डोंगरे, राजेश बागड़े, संदीप खंडाळे, मंगेश मेश्राम, प्रफुल शंभरकर,प्रशिक मेश्राम तसेच
बचत गटातील महिला, ग्राम पंचायत सदस्य, गावकरी, संघटनचे सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादक चंद्रशेखर भोयर
9373388623
Post a Comment