भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाकडून निषेद मोर्चा

 




भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाकडून निषेद मोर्चा 

 

 

तुमसर:-   आज दिनांक  25/3/2023 रोज शनिवार ला  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार  खासदार राहुल  गांधी यांच्या खासदारकीचा पद रद्द करून त्यांना निलंबन करण्यात आले. त्यासंदर्भामध्ये. संपूर्ण भारत देशात विविध प्रांताप्रमाणे भंडारा जिल्हा मध्ये विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करण्याकरिता काँग्रेसच्या सर्व पक्षांच्या सोबत आज भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील मध्ये भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने विविध सेलच्या माध्यमातून काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. या प्रसंगी काँग्रेसच्या  विविध नेत्यांच्या माध्यमातून  भारतीय जनता पक्षाचा निषेध करण्यात आला.  राहुल गांधी यांच्यावर लागलेल्या आरोपाला लवकरात लवकर रद्द करून त्यांना त्यांच्या मानसन्मा ना  सहित  त्यांना त्यांचा पद पुन्हा  देण्यात यावा.   याकरिता भाजपा चा  निषेध मोर्चा  काढण्यात आला. यावेळी प्रामुख्याने सेवा    दलाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव  अरविंद कारेमोरे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष                      सुरेश अनंतराम मेश्राम, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जय डोंगरे, तुमसर चे मा. शहराध्यक्ष अमर रगडे, जिल्हा परिषदचे सभापती रमेश पारधी, जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष कलाम शेख, काँग्रेस अनुसूचित जातीचे महासचिव महेंद्र मेश्राम, तुमसर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काना बावनकर, तालुकाध्यक्ष बबलू कटरे, तुमसर शहर चे उपाध्यक्ष अमित लांजेवार,  सेवा दलाचे सेवा शहराध्यक्ष नीरज गौर, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष  राजा भाई. महिला शहराध्यक्ष,  करुणा धुर्वे ताई, उपाध्यक्ष नूतन भोले. व समस्त महिला काँग्रेसचे पदाधिकारी व  विविध सेलचे पदाधिकारी, काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी हे सर्व मोठया संख्येने उपस्थित होते.




संपादक चंद्रशेखर भोयर

9373388623














कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe