साकोली येथे आढावा बैठक संपन्न
साकोली
बैठकीला उपास्थित सर्व सदस्य, कार्यकर्ता व पदाधिकारी
भंडारा :- काल दिनांक 24 /09/ 2024 ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या आदेशानुसार, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक साकोली येथील विश्राम गृहात मा. सुरेश अनंतरामजी मेश्राम जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित नवनियुक्त भंडारा जिल्हा प्रभारी अनुसूचित जाती विभाग माननीय माला ताई खोब्रागडे यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला व यांच्या मुख्य मार्गदर्शनांमध्ये सभेला सुरुवात करण्यात आली.
या वेळी अध्यक्षांनी माहिती देतानी आपल्या वक्तव्यातून बोलले की प्रत्येक गावोगावी बूथ कमिटी तयार झाली पाहिजे, प्रत्येक गावातून दोन संविधान रक्षक व काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन पक्षाकरिता पूर्ण ताकत लावून काम करावे व अडलेल्या लोकांना मदत करावी व सामूहिक मदतीच्या माध्यमातून समाजाच्या विकासा करिता तत्पर रहावे अशा शब्दात सभेला संबोधित केले. व प्रत्येक तालुका अध्यक्षांचा आढावा घेऊन सभेची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले मा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी प्रमिला हरडे, रेखाताई चरडे, सचिन दादा टेंभुर्णीकर, रुदर्शन भजनकर जिल्हाध्यक्ष सांस्कृतिक विभाग, जिल्हा महासचिव महेंद्र मेश्राम, लाखांदूर तालुका अध्यक्ष गोपाल मेंढे, शहर अध्यक्ष लाखांदूर रहीम मेश्राम, पवनी तालुका अध्यक्ष सदानंद धारगावे, साकोली तालुका अध्यक्ष कुणाल गणवीर, साकोली शहर अध्यक्ष पराग कोठांगले , लाखनी तालुका अध्यक्ष रितेश कांबळे, लाखनी कार्याध्यक्ष पराग शामकुवर , तुमसर तालुका अध्यक्ष अजय गौरेकर, मोहाडी तालुका अध्यक्ष सुहास सुखदेव, भंडारा शहराध्यक्ष श्याम डोंगरे, कृष्णा फुलकर, महिला तालुका अध्यक्ष नेहा रंगारी, निर्मला नंदेश्वर, जयश्री वाघमारे, वैशाली गजभिये, अंबर येटरे, श्याम शिवरकर, धनीराम भाजीपाले, आकाश मेश्राम, अंकुर रामटेके, विशाल गजभिये, दिनेश दादा काटोले सचिव विधानसभा क्षेत्र साकोली यांच्या उपास्थिती मध्ये आढावा बैठक घेण्यात आली.
या प्रसंगी समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थित होते.
या सभेला साकोली व भंडारा जिल्ह्यातील विविध गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
संपादक चंद्रशेखर भोयर
9373388623
Post a Comment