बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत चेक चे वितरण
बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत प्रियंका सोनेवाने यांना चेक देतानी मा. तुलसीराम गेडाम व सहकारी.
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातिल तुमसर तहसील मध्ये येणाऱ्या चुल्हाड येथे बेटी बचाओ - बेटी पढाओ या भारत सरकार नीती आयोगा द्वारे पे टू पे सोशियल फाउंडेशन जयपुर या संस्थेची सभा आयोजित करण्यात आली. ही सभा चुल्हाड येथील मंगला अरुण नंदुरकर यांचे निवासस्थानी घेण्यात आली. ही सभा सम्राट अशोक सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष तुलसीराम गेडाम यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.
या सभेला पे टू पे सोशल फाउंडेशन भंडारा जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर व सम्राट अशोक सेनेचे पूर्व विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष अमरकंठ बांडेबुचे व पेटूपे सोशियल फाउंडेशन गोंदिया जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर व सम्राट अशोक सेनेचे गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष तेजस मेश्राम, सम्राट अशोक सेनेचे राष्ट्रीय महासचिव मनोज कुमार खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर युवराज जमाईवार, राजेश बडोले, राजगुरू बावनथडे विनोद उईके, सम्राट अशोक सेनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष नामदेव मेंढे, सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी हट्टेवार, लता नंदुरकर इत्यादींनी संस्थेच्या वाटचालीवर सविस्तर मार्गदर्शन केले.
तुलसीराम गेडाम यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये योजने ची वैशिष्टे व सविस्तर माहिती देतानी सांगितले की, मुलीच्या लग्नासाठी कन्यादान सहायता, गरोदर महिलांसाठी मुलींच्या जन्म सहायता, विधवा महिलांना मुलींचे लग्न सहायता ,अनाथ मुलगी सहायता, पालक अपघात सहायता , पालकांच्या महाभयंकर आजार सहायता, पालकांचा अचानक मृत्यू सहायता इत्यादी अनेक सहायता देण्याचे कार्य पेटूपे सोशल फाउंडेशन संपूर्ण भारतभर करीत आहे.
चुल्हाड येथील प्रियंका विजय सोनेवाने ह्या महिलेने पाच-सहा महिन्यापूर्वी बेटी बचाओ बेटी पढाओ पे टू पे सोसियल फाउंडेशन कडे ऑफलाइन व ऑनलाईन अर्ज केले होते. अचानक काही दिवसापूर्वी विजय सोनेवाने यांचा अपघात झाला. व अपघातात मृत्यू झाला . म्हणून पालक अपघात सहायता , पेटूपे सोसियल फाउंडेशन या संस्थेने मृतकाच्या पत्नी प्रियंका सोनेवाने यांना दोन हजार शंभर रुपयाचे चेक सभा अध्यक्ष तुलसीराम गेडाम, अमरकंट भांडेबुचे, तेजस मेश्राम ,मनोज खोब्रागडे , मीनाक्षी हटेवार ,लता नंदुरकर ,मंगला नंदुरकर यांच्या हस्ते देण्यात आला.
सभेला यशस्वी करण्याकरिता रोशनी पारधी, ज्योती राऊत , दुर्गा नंदुरकर , मनीषा पारधी, अनिता ठाकरे , सत्तेसीला पारधी, रोहित मेश्राम ,रेखा माकडे इत्यादींनी परिश्रम घेतले तर संचालन मीनाक्षी हट्टेवार यांनी केले तर आभार लता नंदुरकर यांनी करून सभेची सांगता केली.
संपादक चंद्रशेखर भोयर
9373388623
Post a Comment