सिलेगाव क्षेत्रातील तीन गावांसाठी 334.84 लक्ष रुपयांचं भरीव निधी मंजूर
उपसभापती मा. हिरालाल नागपुरे यांच्या अथक प्रयत्नाने पाणीपुरवठा योजना मंजूर .
तामसवाडी ,हरदोली, कर्कापूर येथील पाणीप्रश्न सुटणार
भंडारा:- तुमसर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सिलेगाव पं.स.क्षेत्रात भीषण पाणीटंचाई ची परिस्थिती निर्माण झाली आहे. हे लक्षात घेता या भीषण पाणीटंचाई चं मार्ग मोकळा करण्यासाठी अथक प्रयत्न करणारे क्षेत्रातील उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी कंबर कसली व पाणीटंचाई वर मात करण्यासाठी सतत शासन ,प्रशासनाकडे पाणीपुरवठा बाबत तगादा लावीत क्षेत्रातील मौजा तामसवाडी,हरदोली व कर्कापूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत भरीव निधी मंजूर करून घेतले.
यात मौजा तामसवाडी येथे 93.76 लक्ष रुपये , तर
हरदोली येथे 1 करोड 41 लक्ष रुपये
आणि कर्कापूर येथे 97.08 लक्ष रुपये.
असे एकूण 334.84 लक्ष रुपयांचा भरीव निधी विशेष प्रयत्नातून मंजूर करून घेतले व गावात पाणीटंचाई भासू नये, गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. यासाठी विशेष लक्ष केंद्रित केले.
सिलेगाव क्षेत्रातील तामसवाडी,हरदोली व कर्कापूर येथे 334.84लक्ष रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल क्षेत्रातील ग्रामस्थांनी उपसभापती मा. हिरालालजी नागपुरे यांचे खूप खूप अभिनंदन केले.
संपादक चंद्रशेखर भोयर
Post a Comment