राजाभोज जयंती व पोवार समाज मेळावा संपन्न



माजी खा. शिशुपाल पटले यांचे हस्ते मेळाव्याचे उद्घाटन


तुमसर  :-क्षत्रिय युवा पोवार समाज संघटना हसारा च्या वतीने वसंत पंचमीच्या पावन पर्वावर पोवार समाजाचे दैवत चक्रवर्ती  राजाभोज जयंती व  पोवार समाजाचा भव्य मेळावा तुमसर तालुक्यातील हसारा ह्या गावात दि.२६जाने. ला संपन्न झाला. ह्या मेळाव्याचे उद्घाटन किसान मोर्च्याचे  प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार मा. शिशुपालजी पटले यांचे शुभ हस्ते पोवार समाजाची कुलदेवता गडकालिका देवी यांची पूजा करून व फीत कापून करण्यात आले.   तर अध्यक्ष स्थानी हसारा प.स.सदस्या, प.स.तुमसरच्या माजी सभापती सौ.पल्लवी कटरे होत्या.



 बहुतांश पोवार समाज शेतीवरच अवलंबून आहे.परंतु आता शिक्षित होत असल्याने आपला समाज सर्वच क्षेत्रात भरारी घेत आहे.याचा आम्हाला अभिमान  वाटतो असे प्रतिपादन शिशुपाल पटले यांनी उद्घाटन पर भाषणातून केले. जयंतीनिमित्त गावात शोभायात्रा काढण्यात आली तसेच पोवारी आर्केष्ट्रा,महाप्रसाद,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या समाजातील वैक्तींचेही सत्कार करण्यात आले.व्यासपीठावर प.स.तुमसरचे सभापती नांदूजी रहांगडाले,सेवा निवृत्त सैनिक मा. राजेंद्रजी कटरे,पोवार समाज संघटनेचे भंडारा जिल्हा अध्यक्ष मा. विश्वजित पुंडे,आंबागड प.स.क्षेत्राच्या सदस्या सौ.सुशिलाबाई पटले,बुधराजजी पटले,अक्करसिंग पटले,शिवशंकर शरणागत,माजी सरपंच सौ.रत्न कलाबाई भगत,माजी उपसरपंच सौ.प्रियंकाबाई कटरे,सुंदरलाल कटरे, सुखदयाल कटरे, धनलाल पटले,राधेश्याम कटरे,विजय तुरकर,अविनाश पटले,नानेश्वर पटले,दुर्योधन कटरे, लक्ष्मण पटले, प्रमिळाबाई पटले,रामरतन कटरे,चंद्रशेखर बोपचे, संजय येळे, शामलाल टेभरे,रॅकेध पटले, लक्ष्मीकांत पटले,प्रेमलाल टेंम्बरे, छबिलाल पटले,दुलीचंद पटले,जितेंद्र कटरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन सौ.रामेश्वरिताई कटरे यांनी केले,कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्षत्रीय युवा पोवार समाज संघटनेचे अध्यक्ष सचिन शरणागत,उपाध्यक्ष कार्तिक कटरे, सचिव दिलीप कटरे,सहसचीव  कुणाल कटरे,  कोषाध्यक्ष शुभम कटरे, सहकोषाध्यक्ष सनोज राणे यांनी परिश्रम घेतले.



संपादक चंद्रशेखर भोयर 







कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe