गोंडिटोला येथील सरपंच चिंचखेडे यांचा अनोखा उपक्रम

 


अहिल्याबाई होळकर जयंतीदिनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार 

गोंडीटोला ग्रामपंचायतचा उपक्रम    

      ३ महिलांचा सन्मान 


      पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीनिमित्त गोंडीटोला येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात गावात राजकिय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ३ महिलांचा सरपंच शितल चिंचखेडे यांचे हस्ते रोख,  ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि पुस्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. 

              यावेळी आयोजित कार्यक्रमात माजी उपसरपंच हिरालाल शहारे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश रहांगडाले, वैशाली पटले, अंगणवाडी सेविका विंदा गोंडाने, नरेंद्र चिंचखेडे, व्ही डी कोरे, एम, पी कटरे , रंजित चिंचखेडे , नवभारत प्रतिनिधि चंद्रशेखर भोयर उपस्थित होते.




     ग्रामपंचायतच्या सभागृहात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जयंतीनिमित्त सिलेगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश पेरे यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची फोटो ग्रामपंचायतला भेट दिली आहे.

      राज्य सरकारने प्रत्येक ग्रामपंचायतचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करून महिलांना सन्मानित करण्याचे निर्देश दिले आहे. त्या अनुषंगाने सण २०२३ पासून गोंडीटोला ग्रामपंचायतमध्ये जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. 


       सौ. शितल चिंचखेडे ग्राम पंचायत सरपंचा,            गोंडिटोला. 

     जयंती दिनाचे औचित्य साधून राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी उपसरपंच कुंदा शहारे आणि प्रभा रहांगडाले तथा सेवाभावी कार्यासाठी सविता चिंचखेडे यांना सरपंच शितल चिंचखेडे यांचे हस्ते रोख, ट्रॉफी, शाल, श्रीफळ आणि पुस्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. गावांत गेल्या सहा दिवसापासून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ, अपंग,व अन्य लाभार्थी योजनाचे ऑडिट करण्यासाठी प्रशिक्षनार्थी यांची नियुक्ती झाली आहे.  सलग भर उन्हात घरोघरी जाऊन त्यांनी सेवा बजावली आहे. प्रत्येक लाभार्थ्यांचे घरी ऑडिट केले असल्याने वैशाली  कोरे मुरमाडी तुपकर ता. लाखनी आणि माधुरी प्रमोद कटरे आंबागड ता. तुमसर या महिला प्रशिक्षणार्थी  यांना शाल, श्रीफळ व पुस्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  

      दरम्यान कार्यक्रमात नळ योजनेचे मार्च २०२५ पर्यंत कनेक्शन धारकाकडून ५०० रुपये सूट करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरपंच शितल चिंचखेडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यामुळे नळ कनेक्शन धारकांचे एक वर्षासाठी ६५००० रुपये सूट होणार आहेत. थकबाकी आणि ५०० रुपये पूर्ण भरल्यास त्याच कनेक्शन धारकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

      मे महिन्यात महाराष्ट्र दिनी गावातील ३१ कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान सरपंच शितल चिंचखेडे यांनी स्वतः चे सरपंच मानधनातून  केला आहे. सरपंच चषक क्रिकेट प्रतियोगीतेची सुरुवात त्यांनी केली आहे. कार्यक्रमाचे संचालन रंजित चिंचखेडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रकाश रहांगडाले यांनी केले. अल्पोपहार वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.



संपादक मा. चंद्रशेखर भोयर


       सनप्लॉग वरठी

35 लेबर की अर्जेन्ट भर्ती

    आज ही call करें... 

      9373388623.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe