रोग लागण होण्याची काही महत्वाची कारणे



 चला तर जाणून घेऊ....... 

माणसाचा स्वभावाचा आणि

 आजारांचा संबंध काय आहे ?


    तुमची गोष्ट बुद्धी मान्य करत नाही, इथूनच सर्व आजारांना सुरुवात होतो.      सात जन्माचे गाठोडे सोबत घेऊन आले असता  योग, प्राणायाम, ध्यान, साधना यांनी जीवनातील सर्व आजार दोष नाहीसे करू शकतो पण  आपण आज मान्यच करायला तयार नाही. 

हा आपल्या मधील सर्वात मोठा दोष आहे. 

     सर्व गोष्टी तुमच्या मनावर आहेत मनाने ठरवलं की  कुठली ही गोष्ट तुमच्यासाठी अशक्य नाही. 

    तर आता आपण जाणून घेऊ की मनाचा,भावनेचा,विचारांचा, स्वभावाचा कसा व कोठे परिणाम होतो......


1)  अहंकारामुळे हाडामध्ये ताठरता निर्माण होते.


2)  स्वत:चा हट्ट पुर्ण करण्याच्या सवयीमुळे पोटाचे विकार होतात.

3)  अती क्रोध व चिडचिडेपणामुळे यकृताला व पित्ताशयाला हानी पोहचते.

4)  अती ताण व चिंतेमुळे स्वादुपिंड खराब होतो.


5)  भितीमुळे किडन्या व मुत्राशयाला हानी पोहचते.


6)  कपटी वृत्तीमुळे गळ्याचे व फुप्फुसाचे रोग होतात.


7)  आपलं तेच खरं/ मी म्हणेन तीच पुर्व दिशा,अशा अट्टाहसामुळे बध्दकोष्ठता होते.

8)  दु:ख दाबुन ठेवल्याने फुप्फुस व मोठ्या आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.


9)  अधिरता,अतिआवेश,घाई-गडबड अशा सवयींमुळे ह्रदयाला व छोट्या आतड्याला हानी होते.


10)  स्वार्थी लोकांना सगळ्यात जास्त आजार होतात कारण त्यांना द्यायची इच्छा नसते त्यामुळ् शरीराला नको असलेली धातक द्रव्ये पण नीट बाहेर टाकली जात नाहीत व रोग निर्माण होतो.


11)  प्रेम/प्रेमळपणा शांती व समाधान देऊन मनाला व शरीराला ताकद देतं.


12)  स्मित हास्य स्वतःलाच नाही तर समोरच्याला पण आनंदी बनवते.


13)  हसत खेळत राहिल्यास ताणतणाव कमी होतो.

14)   मनामध्ये इर्षा असल्यास आपल्याच शरीराला वाईट सवय लागून माणूस स्वतःच रोगांना आमंत्रण देतो.  

     मन मोकळे पणाने जीवन जगल्यास तानतनाव आओआप नाहीसा होतो. 

     तर मग आता आपल्या  रागावर, विचारांवर, भावनेवर, अहंकारावर, स्वार्थीपणावर, नियंत्रण   करण्याचा प्रयत्न करा. हसत, खेळत, आनंदी, समाधानी, सुखी, संतुष्ट जीवन जगा. व सुखी, निरोगी, संपन्न  व तंदुरूस्त रहा. 


संपादक चंद्रशेखर भोयर









कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe