निवेदनातुन दिला शासनाला इशारा

 


मा. तहसीलदार साहेबांना निवेदन देत असतांनी पदाधिकारी व कार्यकर्ते


भंडारा:- जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग तुमसर द्वारा आज दिनांक. 7/ 5/ 2023 रोज बुधवारला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून तुमसर येथील तहसील कार्यालयामध्ये कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

     नांदेड जिल्यातील (बोढार )गावात 14 एप्रिल ला डॉ. बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरून गावातील मनुवादी लोकांनी जे गुंड प्रवृत्तीचे मानसिक रोगी लोग आहेत .  त्या सर्वांनी नांदेड जिल्यातील बोंढार गावातील दलित समाजाचा मुलगा स्वर्गीय  अक्षय भालेराव यांची कट रचून  हत्या केली.  या प्रकरणात जे जे दोषी आहेत त्यांना शासनाद्वारे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून  त्यांना फाशीची सजा देण्यात यावे, या करिता निवेदन देऊन शासनाला इशारा देण्यात आला..

याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी प्रदेश सचिव भाऊ तितीरमारे, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. सुरेश  मेश्राम, काँग्रेस कमिटीचे प्रदेश समन्वयक  व माजी नगराध्यक्ष मा. अमरदास रगडे , ओ बी सी विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. शंकर  राऊत, भ्रष्टाचार विभागाचे जिल्हाध्यक्ष कैलास  बहिरे, तुमसर नगर परिषदेचे माजी नगरसेवक व नेते बाळाभाऊ ठाकूर, अनुसूचित जातीचें शहराध्यक्ष शिवकुमार बोरकर, महिला शहराध्यक्ष  करुणाताई धुर्वे, महिला उपाध्यक्ष ममता बिसेन, अनुसूचित जाती तालुका अध्यक्ष  सचिन शेंडे, महासचिव महेंद्र मेश्राम,  शहर सचिव दिलीप लांजेवार, अल्पसंख्याक  विभागाचे शहराध्यक्ष हसन भाई रजवी, नागराज मेश्राम, सुदेश मेश्राम, दिनेश भुंगाडे, सागर बिसने, राम बिसने, आनंद मेश्राम, राधेश्याम घोडीचोर, दिनेश  सागर, आलोक बनसोड , प्रेमदास राऊत व समस्त काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.




संपादक चंद्रशेखर भोयर

9373388623








कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe