पोवार समाजाच्या रूढी-परंपरेत भारतीय संस्कृतीचे दर्शन होते- मा. खा. शिशुपाल पटले

 



राजाभोज जयंती निमित्त मार्गदर्शन करतानी मा. खा. शिशुपाल पटले

 

 सिहोरा-     क्षत्रिय राजाभोज पोवार समाज संघटन द्वारे  मौजा सुकळी नकुल,गोंडीटोला,    ता.  तुमसर येथे राजाभोज जयंती चे  दि.  3  जानेवारीी 2023 ला आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी  किसान मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार मा.शिशुपाल पटले तर कार्यक्रमाचे उद्घाटन पोवार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मुरलीधर टेंभरे यांचे शुभ हस्ते पार पडले. सकाळी गावात प्रभात फेरी काढण्यात आली. रथावर विराजमान समाजाची कुलदेवता देवी गडकालिका माता व राजाभोज हे प्रभात फेरीचे आकर्षण होते.   प्रभात फेरी नंतर मार्गदर्शनाचे कार्यक्रम सुरू झाले. 

   समाजात पाश्चिमात्य संस्कृतीच्या शिरकाव्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात आर्थिक व वेळेची हानी होत आहे.  लग्न समारंभ,स्वागत समारोह यांचेवर होणारा खर्च कमी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुरलीधरजी टेंभरे यांनी आपल्या उद्घाटन पर भाषणातून विचार व्यक्त केले.  माजी खासदार मा. शिशुपाल पटले यानी आपल्या   समाजाच्या रूढी परंपरा ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला अनुसरून असून,भारतीय संस्कृतीचे दर्शन करून देणारे असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले.     पोवार समाज संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मा. विश्वजित पुंडे,  देवचंदजी ठाकरे,सतिष चौधरी, मा झाडुजी रहांगडाले व अन्य पदाधिकाऱ्यांनीही मार्गदर्शन केले.  देवेंद्र रहांगडाले,गंगाधर रिनायत,जितू तुरकर,संतोष शरणागत भोजराम तुरकर, गणेश ठाकूर, छोटेलाल पटले, दिगंबर तुरकर,सुभाष बिसने,ताराचंद रहांगडाले,श्रीदयाल रहांगडाले, नंदुभाऊ रहांगडाले, देवेंद्र मेश्राम, गणेश रहांगडाले,राजेंद्र बघेले, संतोष बघेले,लहान नेता संतोष गौतम हे उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष सोहनजी पारधी, सुनील रहांगडाले,रामेश्वर पटले,देवराव रहांगडाले तसेच समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





संपादक चंद्रशेखर भोयर



कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe