प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा राष्ट्रीय किसान दिवस संपन्न



प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय द्वारा राष्ट्रीय किसान दिवस मनाते हुये


तुमसर :-      स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत दया व करुणा वर्षा निमित्त प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ग्राम विकास विभाग, सेवा केंद्र- तुमसर द्वारा राष्ट्रीय किसान दिवस तुमसर येथे नुकताच संपन्न झाला. किसान मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार मा. शिशुपालजी पटले यांचे अध्यक्षतेखाली  कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मा. राजुभाऊ कारेमोरे यांचे हस्ते करण्यात आले.विशेष मार्गदर्शन  रुची ऍग्रो फार्म डायरेक्टर व ग्राम विकास विभागाचे कार्यकारी संचालक मा. महेंद्रजी ठाकूर गोंदिया यांनी केले. नैसर्गिक शेती,शेंद्रिय शेती,कृषी मालाचे निर्यात,विषमुक्त अन्न उत्पादन, काळानुरूप फसलींची निवड इत्यादी विषयांवर या कार्यक्रमात चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.माजी खासदार शिशुपाल पटले, आमदार राजुभाऊ कारेमोरे,कामठी क्षेत्राच्या संचालिका व ग्राम विकास विभागाच्या सदस्या  राजयोगिनी ब्र.कु.प्रेमलता दिदीजी,तुमसर क्षेत्राच्या संचालिका राजयोगिनी ब्र.कु.शक्ती दिदीजी यांचे ही मार्गदर्शन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे सचिव  मा.अनिलजी भोयर,माजी खासदार मा. मधुभाऊ कुकडे,किसान मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष मा. डॉ. हरेंद्रजी रहांगडाले,प्रमोद तितीरमारे,माजी नगराध्यक्ष सौ. गीताताई कोंडेवार,सौ.मिरताई भट्ट,सौ.शोभाताई लांजेवार,मा.कवळूजी पारधी,शंकलालजी देशमुख,यादोरावजी पटले,जयशंकर रहांगडाले, भाऊरावजी पारधी,शंकरजी जयस्वाल, अनिल जिभकाटे,सौ.कुंदाताई वैद्य,हरिषजी मेश्राम,उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रगत शेतकरी व ग्रामवाशी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.





संपादक चंद्रशेखर भोयर




कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe