उद्योगी महिलांची चळवळ गतिमान करण्याकरिता एक पहल

 


           उद्घाटन करीत  असतांनी   मान्यवर


महिला बचत गटांना सहभागी होण्याचे आवाहन 



भंडारा :-  महिलांना  उद्योगी बनविन्याची मोहिम जिल्ह्यामध्ये मागिल काही वर्षा पासून चालत असल्याचे दिसून येत आहे.  परंतु काही कारणाने या कार्याला गति मिळत नसल्याने या मोहिमेला समोर नेण्याकारिता जिल्ह्यात उद्योगी महिलांची चळवळ गतिमान व्हावी याकरिता यशवंतराव प्रतिष्ठान मुंबई व यशस्विनी अभियान व रिलायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार मा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा येथील रिलायन्स मॉलमध्ये नुकताच महिला बचत गटाच्या स्टॉलचा शुभारंभ करण्यात आला.


     यावेळी  कार्यक्रमाचे उदघाटक* श्री धनंजय दलाल साहेब प्रदेश महासचिव एन सी पी भंडारा तर *अध्यक्ष* श्री दीपक पाटील सर जिल्हा व्यवस्थापक उमेद अभियान भंडारा व

प्रमुख पाहुणे  म्हणून

सौ. सरिताताई मदनकर जिल्हा अध्यक्ष एन सी पी भंडारा.

सौ शुभांगीताई रहांगडाले माजी सभापती महिला व बालकल्याण जि. प. भंडारा सौ. नेहाताई शेंडे युती अध्यक्ष एन सी पी भंडारा

सौ. सविताताई तिडके तालुका व्यवस्थापक उमेद अभियान भंडारा,  सौ सुनंदाताई मुंडले जिल्हा समन्वयक शहर यशस्विनी अभियान,  सौ. मनिषा नागलवाडे जिल्हा समन्वयक यशस्विनी अभियान ग्रामीण,  श्री उमेश ऊके सर तालुका  व्यवस्थापक उमेद अभियान लाखनी, सुरेशजी राहांगडाले माजी जि. प. सदस्य, 

रिलायन्स मॉल चे प्रमुख श्री भिसे सर,  सौ कल्पना जाधव, झोळे ताई, लांजे ताई व सर्व बचत गटातील महिला भगीनी 

उपस्थित होत्या.


        यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी यशस्विनी प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली होती. त्याच माध्यमातून यशवंतराव सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी 'सुगरण' हा उपक्रम चालू करण्यात आला .   या उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांना रिलायन्स स्मार्ट मध्ये दर शनिवारी व रविवारी स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती अयोजकांनी दिली.

      महिला बचत गटांनी यात सहभागी होण्याचे आवाहन मा. घनंजय दलाल , दीपक पाटील  व प्रमुख पाहुणे तसेच अयोजकांद्वारे करण्यात आले.




संपादक चंद्रशेखर भोयर







कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe