किरणला अखेरचा निरोप


         🌺🌺  भावपुर्ण श्रद्धांजली 🌺🌺

मोहाडी तालुक्यावर उमटले दुःखाचे डोंगर

मोहाडी :-  तुमसर तालुक्यातील देव्हाडी रेल्वे उड्डाणपुलावर अपघातात शहीद झालेल्या

केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या महिला जवान कु. किरण सुखदेव आगासे यांच्या पार्थिवावर

मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथे शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

करण्यात आले. यावेळी सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनने मानवंदना दिली.

उपस्थितांना अश्रु अनावर झाले होते.    मुंबई येथील पनवेल मध्ये केंद्रीय राखीव पोलिस होत्या. किरण च्या लग्नाची तयारी सुरु 

असल्याने आठ दिवसांपूर्वी आपल्या गावी निलज येथे आल्या होत्या. तुमसर येथे शुक्रवारी तुमसर येथे गेल्या होत्या. कपड़े

असताना देव्हाडी रेल्वे उड्डाण पुलावर खरेदी देण्यासाठी त्या भावासोबत दुचाकीने खरेदीनंतर सायंकाळी गावाकड़े परत येत असतांनी ट्रकखाली चिरडून त्या जागीच ठार झाल्या. तर भाऊ गंभीर जखमी झाला.  तुमसर येथे

शनिवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर किरणचे पार्थिव निलज येथे आणण्यात आले.

सैनिक,केन्द्रीय राखीव पोलीस दल,CRPF पनवेल सर्व उपस्थित होते.  आपल्या लाडक्या लेकीचे पार्थिव पाहताच आई वडिलांनी हंबरडा फोडला.  काल शनिवारी दुपारी १ राष्ट्र्वाजात

गुंडाळलेले किरणचे पार्थिव फुलांनी सजविलेल्या वाहनातून गावातील मुख्य रस्त्याने स्मशानभूमीकडे नेण्यात आले.

रस्याच्या दोन्ही बाजूनी नागरिकांची गर्दी होती. भारत माता की जय, किरण आगासे

अमर रहे, अशा घोषणा देिण्यात आल्या. कोब्रा बटालियनचे सहायक कमांडर मनीषकुमार व

सुरेशकुमार यांच्या नेतत्वात मानवंदना देण्यात  आली.


      रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नागरिकांची गर्दी होती.  आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार

मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, सभापती रितेश वासनिक, करडीचे ठाणेदार

राजेंद्र गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन आगासे, जिल्हा परिषद सदस्य वाजता

महादेव पचघरे, डॉ. युवराज जमईवार, वासुदेव बांते, पंचायत समिती सदस्य प्रीती शेंडे, वंदना सोयाम, महेंद्र शेडे, महादेव फुसे,

भगवान आगासे, राधेश्याम आगासे उपस्थित होते.




संपादक चंद्रशेखर भोयर






कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe