सुमित तुरकर 85% गुणांसह शाळेतुन प्रथम
सुमित तुरकर यांचे स्वागत व सत्कार करीत असताना प्राध्यापक व इतर
सिहोरा :- तहसील मधील स्व.सेवकरामजी पारधी मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय टेमनी येथील 100% निकाल जाहिर.
एस.एस.सी.परीक्षा मार्च 2023 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये एकूण बसलेल्या विधार्थ्यां पैकी 100% निकाल लागल्याने टेमनी येथे जल्लोस साजरा करण्यात आला. प्रत्येक शाळा ही नेहमी आपल्या शाळेचा निकाल उत्कृष्ट असावा अशा प्रयत्नात असतो. अशातच विद्यालयाने यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एस.एस.सी.परीक्षा मार्च 2023 च्या निकालामध्ये स्व.सेवकरामजी पारधी मेमो.हाय.व कनिष्ठ महाविद्यालय टेमनी शाळेचा निकाल 100% लागलेला असून एकूण 9 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. या शाळेतील बाकीचे सर्व विद्यार्थी प्रथम व द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत .
सुमित तुरकर यांनी आपल्या अभ्यासाच्या पद्धतीत अविरत प्रयत्न करून शिक्षक व पालकांच्या मदतीने कठोर परिश्रम करून 85% गुण घेऊन शाळेतुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे टेमनी गावात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घरातील कामे, शेतीची कामे या सर्व कामांमध्ये पालकांना मदत करून देखील शाळेतून प्रथम येणाऱ्या या गुणवंताचे शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस.पी.बोपचे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. व त्याच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.
याच शाळेतील कु.प्राची ऊके व शिद्धांश बनकर यांना अनुक्रमे 84% व 83% गुण मिळाले असून द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत .
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री.एस.पी.बोपचे व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
Your Advertising Here
9373388623
एक बार लगाए, बार बार कमाए
संपादक चंद्रशेखर भोयर
9373388623






Post a Comment