कल्याणी ताईंच युवकांना आव्हान
जेव्हा हा करू शकतो तर तुम्ही का नाही?
तुमसर:- *हा लहान मुलगा या वयात अशी मेहनत करू शकतो तर युवकांनो तुम्ही का नाही ? असा प्रश्न कल्याणी ताईं नी युवकाना केला. सर्व शक्य आहे फक्त सकारात्मकता आपल्यात आणा*.
त्यांनी एका सत्य घटने वरुन सांगीतले की, नागपुर ला जातांना एक सुखद अनुभव आला . नाश्ता करायला एका छोट्याशा टपरीवर थांबले. नाश्ता बनविनारा मुलगा बघुन मला सुखद आनंद झाला आणि विचार केले की याच्याच हातच खायच. पुढे त्या सांगतात की, त्या मुलाने माझ्या करीता एकदम मस्त दोसा तयार केला.
हल्दीराम पेक्षा ही चवीचा.
त्याला विचारले कारे बाळा तुझे वय किती तो म्हणतो ताई मी 15 वर्षाचा.
काही वेळ स्तब्ध झाले आणि त्याला बोलके केले त्याची परिस्थिति ऐकुन गहीवरून आले.
तो म्हणाला मी दहावीची परिक्षा देऊन ITI मधे प्रवेश घेतला आणि घरची परिस्थिति अत्यंत हलाकीची आहे . वडिल मजुरी करून आणि आई घर काम करते. बहिन लहान आहे शिकत आहे.
माझ शिक्षण मला पुर्ण करायचे आहे मला खुप शिकायचे आहे म्हणून मी सकाळी दोसा -ईडली बनवितो आणि 11 वाजता काॅलेज करतो.
आजची युवा पीढ़ी म्हणते हाताला काम नाही शिकुन काय उपयोग .
वाईट मार्ग अवलंबुन गुन्हेगारी कडे वळत आहे . टपरीवर बसुन पानठेला जागत आहे.
त्या सर्व युवकांना विनंती करते की हा छोटा 15वर्षाचा मुलगा जर अशी मेहनत करू शकतो तर तुम्ही का नाही. पूढे कल्याणी ताई म्हणतात...
आज पासुन ठरवुन घ्या मला या जगात खुप पुढे जायचे आहे मी छोट्या मोठ्या कामाची लाज न ठेवता मी कोणतेही चांगले काम करणार.
संपादक चंद्रशेखर भोयर
अशाच घटना, गोष्टी व शैक्षणिक मार्गदर्शना करीता संपर्क करा....
9373388623.
Post a Comment