दहावीचा निकाल उद्या दु 1.00 वा जाहिर होणार

        


        दहावीचं निकाल बघा आता अगदी सहज 

संग्रहित

        पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2023 ला घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (2 जून ) दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली आहे.  राज्य मंडळाने इयत्ता दहावीची परीक्षा 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालावधीत पार पडली.   दहावीच्या परीक्षेला राज्यातून 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.   त्यात 8 लाख 44 हजार 116 मुले आणि 7 लाख 33 हजार 067 मुलींचा समावेश होता.  राज्यभरातील 5033 केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.   दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याची उत्सुकता सर्वांना होती. मात्र, आता निकालाची तारीख जाहीर झाली आहे. 2 जून 2023 ला निकाल जाहीर झाल्यावर विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाईन प्रिंटआऊट काढून घेता येणार आहे.


           निकाल पाहण्यासाठीच्या लिंक 


1.mahresult.nic.in

2. https://ssc.mahresults.org.in

3. http://sscresult.mkcl.org










कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.
Youtube Channel Image
Chandrashekhar Bhoyar Subscribe To Get More Information
Subscribe